३. भिंतीवर प्रसिद्ध केलेली कोणतीही माहिती हि दिशाभूल करणारी किंवा चुकीची किंवा अद्ययावत नसलेली असल्यास जन माहिती अधिकारी यांच्या निदर्शनास आणून द्यावी. नागरिकांना माहिती अधिकार अधिनियमाच्या कलम १८ अन्वये राज्य माहिती आयोगाकडे तक्रार दाखल करता येईल.
माहिती अधिकार अधिनियम २००५
- कोणत्याही सार्वजनिक प्राधिकरणाकडे असलेल्या अभिलेखाची छायांकित प्रत घेणे, काम आणि अभिलेख यांची तपासणी करणेचा हक्क नागरिकांना आहे.
- माहिती मिळविण्याकरिता जन माहिती अधिकारी यांचेकडे संपर्क करावा.
- माहिती मिळविण्यासाठीचा अर्ज रुपये १०/- फीसह ( रोख / दर्शनी धनाकर्ष / धनादेश / न्यायालयीन मुद्रांक यापैकी एका स्वरुपात फी भरता येईल. ) जन माहिती अधिकारी यांच्याकडे सादर करणे आवश्यक आहे.
- माहितीचा अर्ज भरण्यासाठी आपणास मदत हवी असल्यास कायद्यातील तरतुदीप्रमाणे ती जनमाहिती अधिकारी यांनी करणे अभिप्रेत आहे.
- जन माहिती अधिकारी यांनी मापण मागितलेली माहिती ३० दिवसात पुरविणे आवश्यक आहे. सदरची माहिती ग्राम पंचायतीकडे ठेवलेली नसली तर जनमाहिती अधिकारी सदरचा अर्ज संबंधित सार्वजनिक प्राधिकरणाकडे हस्तांतरित करेल.
- विविध कालमर्यादेत माहिती पुरविली नसल्यास सदरची माहिती विनामुल्य देण्यात येईल.
- ग्राम पंचायतीच्या भिंतीवर प्रसिद्ध केलेल्या माहितीची तपासणी करण्यासाठी नागरिकांस अर्ज करणे, किंवा अर्ज फी भरणे किंवा ३० दिवसापर्यंत वाट पाहण्याची आवश्यकता नाही.
- नागरिकांस माहिती मिळाली नाही किंवा दिशाभूल करणारी माहिती मिळाली तर त्याला /तिला माहिती अधिकारातील माहिती कलम १८ नुसार तक्रार दाखल करता येईल.
- नागरिकांस प्रथम अपिलीय अधिकारी यांच्याकडे अपील दाखल करता येईल.